थायरॉईड (Thyroid)आणि आयुर्वेद

Thyroid And Ayurveda

थायरॉईड (Thyroid)

आजकाल सामान्य पणे सगळीकडे आढळणारा आजार म्हणजे थायरॉईड म्हणू शकतो आपण.थायरॉईड म्हणजे शरीरामधील संप्रेरके/हॉर्मोन तयार करणे हे मुख्य काम आहे. हेच हॉर्मोन तयार करण्याचे काम जेव्हा कमी किंवा जास्त प्रमाणात होते त्याला थायरॉईड आजार म्हणू शकतो. त्याचे hyper आणि hypo थायरॉईडीसम असे प्रकार करू शकतो.
थायरॉईड ही एक छोटी ग्रंथी gland आहे, जी मानेच्या समोर घश्याच्या मागच्या भागात असते, त्याचा आकार हा फुल पाखरा सारखा असतो .थायरॉईड चे काम बिघडले तर त्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर झालेला दिसतो.

थायरॉईड कोणाला होऊ शकतो-
1. अनुवंशिकता असेल घरा मध्ये
2. अनेमिया ची जुनी हिस्टरी असेल तर.
म्हणजे शरीरामध्ये रक्ताचे Hb चे प्रमाण कमी असल्यास
3. Type-1 डायबीटीस मध्ये
4. जुना वात विकार असतील तर
5. Iodine जास्त असलेले औषधी घेतल्यामुळे

Hyper Thyroidisum-
लक्षणे-
Anxiety,भीती वाटणे,मूड सतत बदलणे, Palpitation-सतत धड धड जाणवणे,
निद्रानाश,वजन कमी होणे,
Constipation,मलबध्दता,
Irregular Peroids,
Goiter ग्रंथी ची वाढ होणे

Hypo thyroidisum ची लक्षणे-
थकवा येणे,
वजन वाढणे,
विसारभोळे पणा वाढणे,
Peroid मध्ये अंगावरून खूप जाणे,
dry hair,
आवाजात बदल घोघरा होणे.

Blood test-thyroid function test करावी.
T3,T4,TSH लेव्हल चेक केले जातात.

Diet आहार-
खाणे टाळावे-अपथ्य
कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली,
बाजरी, रागी
सोयाबीन चे पदार्थ, सोया milk,
कॉफी टाळावी.
Almond,बदाम,
शेंगदाणे.

काय खावे-पथ्य हे पदार्थ सतत खाण्यात असावेत-
Fish मासे
Mango आंबे
Banana केळी रोज
सुके खोबरे
कुळीथ

व्यायाम-सूर्यनमस्कार रोज घालावेत.
Weight training चे व्यायाम करावेत-घाम गळे पर्यंत व्यायाम करावा.
आयुर्वेद आणि थायरॉईड-
थायरॉईड हा कफज व्याधी सांगितलाआहे,त्याचे स्थान सुद्धा कफ भागात आहे.
यामुळे वमन ही सर्वोत्तम चिकित्सा आयुर्वेदाने संगीतली आहे. वमन नंतर थायरॉईड ग्रंथीचे काम पूर्ववत होण्यास मदत होते.थायरॉईड च्या रिपोर्ट्स मध्ये एका वमनाने खूप बदल दिसून येतात. वमन मध्ये दूषित कफ दोष बाहेर काढला जातो. कांचनार गुगुल, त्रिफळा गुगुल सारखे कल्प आयुर्वेदामध्ये आहेत,ज्याने थायरॉईड कमी होण्यास मदत होते. औषधी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावीत.
पूर्वी ह्या आजाराचे प्रमाण कमी होते, परंतु आता ते प्रमाण वाढले आहे, लहान मुलांमध्ये सुद्धा जाडी वाढून थायरॉईड ची लक्षणे दिसू शकतात.. त्यासाठी समतोल आहार आणि रोजचा व्यायाम हाच उत्तम आरोग्याचा मंत्र असेल.

 

* आरोग्य तज्ज्ञ *

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)

श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44