डोळ्याखाली काळे सर्कल

Dark Circle

डोळ्याखाली काळे सर्कल

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं तरूण वयात वयस्कर बनवतात. या काळ्या वर्तुळांमुळे समोरच्याला तुम्ही थकलेले किंवा आजारी भासतात.यांनाच डोळ्याभोवती काळी वर्तुळे, Periorbital circles ,Under eye circles ,Dark circles असे ही म्हणतात.
मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा परीपुर्ण उपाय नव्हे.

डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने या समस्येचा विचार करु या.

आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वात व पित्त दूषित होऊन स्थानसंश्रय भेदाने डोळ्याच्या त्वचेखाली वैवर्ण्य किंवा गडदपणा निर्माण होतो. आपल्या डोळ्यांच्या खाली व गालांच्या वर जी त्वचा असते, ती खूप नाजूक आणि कमालीची पातळ असते. त्या त्वचेला रक्तपुरवठा करणार्‍या खूप सूक्ष्म अशा केशवाहिन्यांचे एक जाळे त्यामध्ये असते. त्या केशवाहिन्यांमधून रक्त वाहताना त्यांच्या बाह्य आवरणातून काही लाल रक्तपेशी बाहेर पडतात आणि त्वचेखाली जमा होतात. केशवाहिनीच्या बाहेर पडलेल्या या पेशी मृत पावतात. त्या ठिकाणी काही किण्वक रस निर्माण होतात आणि रक्तपेशींचे विघटन होऊ लागते. विघटित होताना या लाल रक्तपेशीतून एक निळसर काळे रंगद्रव्य निर्माण होते. त्याच्या रंगामुळे ही नाजूक त्वचा काळी दिसू लागते.
ही वर्तुळ येण्याची कारणे.

*हर्मोन मधील बदलामुळे स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी हे बदल होतात.
*आपणास एखाद्या विशिष्ट गोष्टीची अँलर्जी वारंवार होत असेल तरीही ही वर्तुळ येतात.
*लिव्हर संबंधित आजार कावीळ असल्यास ही हे बदल होतात.
*अशक्तपणा, अँनिमिया, पंडूरोग अथवा शरीरात झपाट्याने कमी होणारी आयरनची मात्रा अथवा या आजारामुळे ही आयरनची मात्रा कमी होऊन परिणामी डोळ्याखाली डाग येतात.
*व्हिटॅमिन चा अभाव शरीरात अ’, ‘क’, ‘ई’ आणि ‘के’ जीवनसत्वे योग्य प्रमाणात नसल्यास ही वर्तुळे येऊ शकतात.
*घरात अनुवंशिकतेमुळे ही अशी वर्तुळ दिसतात.
*वाढत्या वयोमानानुसार ही काळी वर्तुळ दिसतात.
*कायमस्वरूपी सर्दी होत असेल तरीही या भागातील नसा हळव्या होऊन हा त्रास होऊ शकतो.
*बर्याच कालावधी पासून शरीरात चर्मरोग तरीही वर्तुळ तयार होतात.
*सतत रडल्याने ही समस्या निर्माण होते.
*आहारात मिठाचे प्रमाण अधिक असल्यास ही समस्या जन्म घेते.
*कमी पाणी प्यायल्याने देखील ही समस्या निर्माण होते या केसमध्ये घातक विषक्त पदार्थ बाहेर न पडल्याने समस्या निर्माण होते.
*रक्तातील हिमोग्लोबीन कमी झालं असल्यास काळी वर्तुळं येतात.
*अपुरी झोप,सततची चिंता,भिती, तणाव,अतीविचार यामुळे ही समस्या तयार होते.
*अधिक काँप्युटर, मोबाईलचा वापर.
*योग्य चौरस आहाराचा आभाव जंकफूड,सर्व भाज्या न खाणे आवडनिवड अधिक.
*पोटसाफ नसणे,सतत बध्दकोष्ठ, गँसेस,सतत धावपळ या गोष्टी सुध्दा या समस्येला जन्म देतात.
*कच्चे अथवा कमी शिजवलेले मटण खाल्यामुळे हे इनफेक्शन होते यालाParasite infection इनफेक्शन असेही म्हणतात.यामुळे डोळे
सूजतात,डोळ्यांच्या त्वचेचा रंग बदलतो व डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात.
*कधीकधी थायरॉईड हॉर्मोन्सच्या अभावामुळे डोळ्याच्या टिश्यूजमध्ये पाणी जमा झाल्याने काही लोकांच्या डोळ्याखालील त्वचेचा रंग गडद होतो.
*किडनी मध्ये बिघाड झाल्यास त्वचेखाली द्रवपदार्थ साठू लागतात.त्यामुळे या विकाराचे प्रथम लक्षण सूजलेले व काळी वर्तुळे निर्माण झालेले डोळे हे असू शकते.
*जवळचे किंवा लांबचे पाहताना त्रास होत असल्यास, समोरचे पाहताना डोळ्यांवर ताण येत असल्यास डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात.
*अॅमलॉईड या प्रोटीनच्या जमा होण्याने ही समस्या निर्माण होते.कधीकधी काही रुग्णांमध्ये यामुळे त्वचेतून रक्त देखील येऊ लागते.या स्थितीत डोळ्यांच्या पापण्यांखालील छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा झाल्याने त्वचेवर गडद रंगाचे चट्टे दिसतात अथवा काळे डार्कसर्कल तयार होतात यालाAmyloidosisअसे ही म्हणतात.
*डोळ्याच्या पापण्या व आजूबाजूच्या भागाला हे इनफेक्शन व दाह झाल्यामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.या स्थितीला Periorbital cellulitis असेही म्हणतात.

*** *आहार ***

संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट,अर्धकच्चे भोजन,अती जड पदार्थ ,तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. शरीर रूक्ष होऊ नये म्हणून रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

यावरील घरगुती उपाययोजना

*चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
*बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.
*पदिना वाटून त्यामध्ये लिंबाचा रस टाकून काळ्या वर्तुळांना लावावा व पंधरा ते वीस मिनिटांनी पाण्याने धुवून टाकावे.
*बाटाटा व काकडीचा रस काढून त्या रसात कापसाचे बोळे बुडवून ते पंधरा मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवावेत.
गुलाबपाण्यात कापसाचे बोळे बुडवून दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर झोपताना नियमित ठेवावेत.
*एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. दोन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून काढावे.
*जायफळ चांगले पाण्यात उगाळून काळ्या वर्तुळांना रात्री झोपताना लावावे
*चहाचा चोथा थंडकरुन याने हलकेच डोळ्याखाली मसाज करा.याने छान स्क्ररबींग होऊन रक्तपुरवठा सुरळीतपणे होऊन ही समस्या दुर होईल.
*काकडीची गोल काप करून दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा.
*कोरफडीचा गर काढुन किंचित हळद घालून नियमितपणे लावावा.
*खोबरेल तेल, एरंड तेल मिक्स करुन लावावे.
* कुंकुमादि तेल, दूध, हळद, केशर, ग्रीन टी एकत्रित पेस्ट करून लावावे हलका मसाज करावा.

औषधी उपाययोजना

औषधांमध्ये गंधक रसायन, आमलकी रसायन, आवळा मुरब्बा, च्यवनप्राश, सारीवाद्यासव, खदीरारिष्ट, मंजिष्ठा, आरोग्यवर्धिनी.तसेच अनेक औषधांचा वापर वैद्याच्या सल्याने करता येतो.

* आरोग्य तज्ज्ञ *

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)

श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44