पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Rainy illness and care to be taken for it

पावसाळ्यातील आजार 

नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते. परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजार घेऊन येतो. तसेच हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते.

आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळ्यामध्ये पाणी आणि वारा दूषित झालेला असतो. त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात.

पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे. पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, कॉलरा.

तसेच पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, अम्लपिल यांसारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागतात. योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते.

या दूषित वाऱ्यापासून आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काय करावे, काय खावे, कसे वागावे यासाठी आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील आजारांपासून आपले व आपल्या कुटुंबियांचे कसे संरक्षण करावे.

*हे आजार होऊ नयेत म्हणून आपण खालील काळजी घ्यावी. *

1. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे.

2. पालेभाज्या, फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात.

3. रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत.

4. दूषित हवेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये वेखंड, गुग्गुळाचा धूर करावा.

5. पावसाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. अतिसार, मलेरिया, गोवर, कांजिण्या या व्याधींचे प्रमाण लहान बालकांमध्ये वाढलेले दिसते. हे टाळण्यासाठी मुलांना आयुर्वेदिक सितोपलादी चूर्ण, अरविंदासव, महासुदर्शन काढा आदी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने नियमित द्यावीत.

हे लक्षात ठेवा

1. दररोज सर्वांगाला तिळाचे तेल कोमट करून मसाज करणे, व नंतर कोमट पाण्याने स्नान करावे.

2. गाईच्या दुधात हळद, सुंठ व तुळशीची पाने उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. 3. पावसाळ्यात तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, साबुदाणा, मसालेदार, चमचमीत अन्न, फास्ट फूड आरोग्यास हानिकारक आहेत.

4. फ्रिजमधील अतिथंड पाणी पिणे, कोल्ड ड्रिंक्स, आइसक्रीम यामुळे भूक मंदावते. सर्दी, खोकला यासारखे आजार लवकर होतात.

5. गुणांनी विरुद्ध असणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत. उदा. दूध +फळे, मिल्कशेक, दूध व मासे,मांसाहारानंतर आईस क्रीम.इ.

 

* आरोग्य तज्ज्ञ *

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)

श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44

शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.
पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.