भिजवलेल्या सैंधव मिठाचे महत्त्व जाणून घ्या!

भिजवलेल्या सैंधव मिठाचे महत्त्व जाणून घ्या!

मॅग्नेशियम सल्फेट यालाच सैंधव मीठ म्हणून ओळखले जाते. ते मीठ पाण्यात मिसळले असता मॅग्नेशियम आणि सल्फेट आयर्न सोडते. जे मानवी त्वचेद्वारे सहजपणे शोषले जाऊ शकते. याच्या 20 ग्रॅमच्या पॅकेटसाठी 10 रुपये लागतात. सैंधव मिठाचे काही फायदे पुढीलप्रमाणे…

शरीराच्या वेदनांपासून मुक्तता: भिजवलेल्या सैंधव मिठामुळे शरीर आणि सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. मॅग्नेशियममुळे शरीरात स्नायू सुखावतात. त्यामुळे महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तुम्ही अगदी बाथटब घेण्याची गरज नाही. सैंधव मीठ असलेल्या पाण्यात गुडघ्यापर्यंत पाय ठेऊ शकता. ज्येष्ठ नागरिकांमध्ये साधी आणि गुडघेदुखीचा त्रास जास्त असतो. तर 20 ते 30 या वयोगटातील तरुणांकडून चुकीच्या आहार पद्धतीमुळे हाडांच्या समस्या निर्माण होतात.

विश्रांती आणि पुनर्प्राप्ती: अनेक अ‍ॅथलिट आपल्या प्रशिक्षणानंतर सेंधव मीठ घातलेल्या बाथ टबमध्ये बाथ घेतात. सैंधव मीठ सौंदर्य देणारे दाहक विरोधी आणि स्नायू शिथिल करणारे आहे. त्यामुळे खेळाडूंच्या प्रशिक्षणानंतर किंवा शस्त्रक्रियेमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना सैंधव मीठाच्या अंघोळीने वेदना कमी होतात.

झोपेसाठी मदत करते: अनेक लोक झोपेपूर्वी सैंधव मीठाच्या पाण्याने आंघोळ करतात. या लोकांना चांगली झोप लागते. दरम्यान त्यांना मिळालेल्या मॅग्नेशियममुळे निरोगी पातळी वाढते. उती, सांधे आणि स्नायू मध्ये थकवा कमी होतो.

फिट असल्यास फायदेशीर: अनेक प्रौढांना किंवा लहान मुलांना फिट येण्याचा त्रास होतो. ज्यामध्ये सैंधव मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने यात सुधारणा करण्यास मदत होते.

डीटॉक्सीफिकेशन: हे मानवी शरीरासाठी महत्त्वाचे आहे. वजन कमी करणे, निरोगी राहणे, रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे. यासाठी सैंधव मीठ यामुळे होणारे शरीराचे डीटॉक्सीफिकेशन फायदेशीर ठरते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी देखील सैंधव मिठाचा वापर करता येतो. शरीरातील आणि त्वचेतील पदार्थ बाहेर टाकण्यास सुरुवात होते. यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 कप सेंधव मीठ घालून 15 ते 45 मिनिटांपर्यंत पाय भिजवून ठेवल्यास फायदा होतो.

ताण: मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो. स्नायू शिथिल होतात. त्यामुळे मेंदूला देखील आराम मिळतो. तर ताण तणाव कमी होतो. सैंधव मिठामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडल्याने शरीराला आराम मिळून ताण-तणाव दूर होण्यास मदत होते.

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास सूज आणि दाह कमी होतो. शरीरात मॅग्नेशियममुळे स्नायु कार्यरत होतात. जसे हृदयाचे आरोग्य, रक्तदान, मेंदूचे आरोग्य, न्युरोट्रान्समीटर, न्यूरोलॉजिकल फंक्शन केस, त्वचा, यकृत, मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. सैंधव मिठाच्या अंघोळीमुळे पायाचा ताठपणा कमी होतो.

सैंधव मिठामुळे शरीराला मिळणाऱ्या मॅग्नेशियम मुळे चयापचय क्रिया सुधारते. हृदयाच्या आरोग्यासाठी मॅग्नेशिअम महत्त्वाचे असते. तसेच *व्हिटॅमिन D3 व्हिटॅमिन K2 * मिळाल्याने शरीर प्राप्त करते.

सैंधव मीठ भिजवताना अशी काळजी घ्या : जर तुम्हाला कमी रक्तदाब असेल तर सैंधव मिठाचे पाणी वापरू नका. कारण यामुळे रक्तदाब कमी होतो. तसेच मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यास सैंधव मिठाचा वापर करू नये, मूत्रपिंड विषयी समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सैंधव मिठाचा वापर करा.

अशा पद्धतीने सैंधव मीठ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे अन्नाद्वारे किंवा आंघोळीद्वारे सैंधव मीठ घेणे कॅल्शियम मिळवण्यास मोठा स्रोत उपलब्ध करतो.

@@@@आयुर्वेदिक तज्ञ@@@@:

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)

श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44

हेल्पलाइन नं:

7796775000
9422558509
9822634478

Website :
www.infertilityayurved.in
📚 👨‍⚕ जय आयुर्वेद

अधिक माहीतीसाठी खालील Group Join करा.

https://chat.whatsapp.com/H1AQ1UtiZO2ImLyeiECHXC