केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय

Home Remedies for Hair Loss

रोज काही प्रमाणात केस गळणे हे सामान्य आहे,परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात,तसेच हार्मोनचे असंतुल.
बऱ्याच वेळा, आपल्या केसांची आणि त्वचेची स्थिती आपल्या आतील शरीराची स्थिती दर्शवते. म्हणूनच, केस गळती रोखण्यात पोषण महत्वाची भूमिका बजावते.

केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. १ :-
* कढीपत्ता:- हा भारतीय स्वयंपाक घरातील एक सामान्य मसाला आहे, जो आरोग्यासाठी विशेषतः केसांसाठी उत्तम आहे. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन,प्रथिने, लोह,कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. कडीपत्त्यामुळे केस गळती रोखली जाऊन अकाली पांढरे होण्यापासून देखील त्यांचा बचाव होतो.केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर आहारात तर महत्त्वाचा आहेच परंतु, त्या व्यतिरिक्त तुम्ही कडिपत्यांपासून खालीलप्रमाणे वेगवेगळे हेअर मास देखील बनवून लावू शकता.

१) कढीपत्ता आणि दही हेअर मास्क:-
कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात केसांच्या लांबीनुसार दही घाला व हा मास्क केसांना लावा हा मास्क २० ते ३० मिनिटे ठेवून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा.

२) कढीपत्ता कांदा हेअर मास्क:-
केसांच्या लांबीनुसार कढीपत्त्याची पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क केसांना लावावा व साधारण ३० मिनिटांनंतर धुऊन टाकावा. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करु शकता .

३) कढीपत्त्याचे तेल:-
कढीपत्त्याचे तेल बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल. नारळाचे तेल गरम करुन घ्यावे.त्यात कढीपत्त्याची पाने टाकावीत व गॅस बंद करावा. नंतर तेलात मेथीचे दाने,जास्वंदाच्या पाकळ्या व एक चमचा अहळीव टाकावे आणि मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे.दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण वस्त्रगाळ करून काचेच्या बाटलीत साठवावे.आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावावे.१५ दिवसात तुमच्यात केसांमध्ये झालेला फरक जाणवेल.

केस गळण्याची कारणे

1) – शरीरात IRON कमी होणे.
शरीरात Calcium कमी होणे.

2) दररोज डोक्यावरुन अंघोळ करणे.

3) केसांसाठी जास्त shampoo किंवा chemical products जास्त वापरणे.

उपाय –

1) आहारात Iron आणि Calcium युक्त पदार्थ घेणे, जसे- खजुर,मनुका, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या, दूध यांचा आहारात समावेश असावा.

2 ) केस आठवडयातून 2 वेळा धूणे व केसांचे तेल दररोज रात्री लावणे.

3 ) केस बाहेर जाताना बांधणे त्याने केस खराब होत नाहीत व प्रदूषणाचा बाईट परिणाम होत नाही.
धन्यवाद!!!!

* आरोग्य तज्ज्ञ *

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)

श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44

शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.
पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.