* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे.
(त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक)
* संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे .
लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा,
राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके पदार्थ खावे.
*तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते.
*पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये.
*उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे .
उदा -उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी
*पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून,
उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी.
*चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस,
बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे.
कार,लिफ्ट,सोफा,शौचाच्या वेळी कमोड यांचा वापर कमीत कमी करावा.
खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे. उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे.
*सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे, stretching करावे.
*आहारात गहू,बेकरी पदार्थ, पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा.
ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे.
*तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा.
भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही.
नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते.
* जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट,
चॉकलेट इत्यादी बंद करावे.
देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) ,
देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) ,
ताक (दुपारी जेवताना) घ्यावे.
* ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको.
*मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग,
काळ्या मनुका (black resins),
जर्दाळू (apricot),खारीक,
लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे.
*पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा.
* ब्रॉयलर प्रकारचे,फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे.
नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे .
*जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या.
*आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.यामुळे चरबी कमी होते.
पंचकर्मातील मसाज(त्रिफळा तेल) व उद्वर्तन उपचार वजन कमी होण्यास उपयुक्त आहेत. सोबतच स्वेदन (स्टिमबाथ ) व लेखन बस्ती अनावश्यक चरबी कमी करतात.
* आरोग्य तज्ज्ञ *
वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)
श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44
Visit-
https://www.infertilityayurved.in/