infertilityayurved

homeremedies

Home Remedies

केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय

केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय रोज काही प्रमाणात केस गळणे हे सामान्य आहे,परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात,तसेच हार्मोनचे असंतुल.बऱ्याच वेळा, आपल्या केसांची आणि त्वचेची स्थिती आपल्या आतील शरीराची स्थिती दर्शवते. म्हणूनच, केस गळती रोखण्यात पोषण महत्वाची भूमिका बजावते. केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. १ :-* कढीपत्ता:- हा भारतीय स्वयंपाक घरातील एक सामान्य मसाला आहे, जो आरोग्यासाठी विशेषतः केसांसाठी उत्तम आहे. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन,प्रथिने, लोह,कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. कडीपत्त्यामुळे केस गळती रोखली जाऊन अकाली पांढरे होण्यापासून देखील त्यांचा बचाव होतो.केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर आहारात तर महत्त्वाचा आहेच परंतु, त्या व्यतिरिक्त तुम्ही कडिपत्यांपासून खालीलप्रमाणे वेगवेगळे हेअर मास देखील बनवून लावू शकता. १) कढीपत्ता आणि दही हेअर मास्क:-कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात केसांच्या लांबीनुसार दही घाला व हा मास्क केसांना लावा हा मास्क २० ते ३० मिनिटे ठेवून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा. २) कढीपत्ता कांदा हेअर मास्क:-केसांच्या लांबीनुसार कढीपत्त्याची पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क केसांना लावावा व साधारण ३० मिनिटांनंतर धुऊन टाकावा. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करु शकता . ३) कढीपत्त्याचे तेल:-कढीपत्त्याचे तेल बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल. नारळाचे तेल गरम करुन घ्यावे.त्यात कढीपत्त्याची पाने टाकावीत व गॅस बंद करावा. नंतर तेलात मेथीचे दाने,जास्वंदाच्या पाकळ्या व एक चमचा अहळीव टाकावे आणि मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे.दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण वस्त्रगाळ करून काचेच्या बाटलीत साठवावे.आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावावे.१५ दिवसात तुमच्यात केसांमध्ये झालेला फरक जाणवेल. केस गळण्याची कारणे 1) – शरीरात IRON कमी होणे.शरीरात Calcium कमी होणे. 2) दररोज डोक्यावरुन अंघोळ करणे. 3) केसांसाठी जास्त shampoo किंवा chemical products जास्त वापरणे. उपाय – 1) आहारात Iron आणि Calcium युक्त पदार्थ घेणे, जसे- खजुर,मनुका, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या, दूध यांचा आहारात समावेश असावा. 2 ) केस आठवडयातून 2 वेळा धूणे व केसांचे तेल दररोज रात्री लावणे. 3 ) केस बाहेर जाताना बांधणे त्याने केस खराब होत नाहीत व प्रदूषणाचा बाईट परिणाम होत नाही.धन्यवाद!!!! * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles मूळव्याध वर घरगुती उपाय वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

Home Remedies

वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे. (त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक) * संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे . लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा, राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके पदार्थ खावे. *तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते. *पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये. *उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे . उदा -उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी *पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून, उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी. *चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस, बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे. कार,लिफ्ट,सोफा,शौचाच्या वेळी कमोड यांचा वापर कमीत कमी करावा. खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे. उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे. *सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे, stretching करावे. *आहारात गहू,बेकरी पदार्थ, पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा. ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे. *तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा. भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही. नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते. * जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट, चॉकलेट इत्यादी बंद करावे. देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) , देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) , ताक (दुपारी जेवताना) घ्यावे. * ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको. *मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग, काळ्या मनुका (black resins), जर्दाळू (apricot),खारीक, लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे. *पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा. * ब्रॉयलर प्रकारचे,फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे. नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे . *जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या. *आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.यामुळे चरबी कमी होते. पंचकर्मातील मसाज(त्रिफळा तेल) व उद्वर्तन उपचार वजन कमी होण्यास उपयुक्त आहेत. सोबतच स्वेदन (स्टिमबाथ ) व लेखन बस्ती अनावश्यक चरबी कमी करतात.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Visit- https://infertilityayurved.in/  

Scroll to Top