infertilityayurved

February 2022

Arthritis

सांधेदुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखी ज्येष्ठ नागरिकांकडून सर्वसाधारणपणे नेहमीच एक तक्रार केली जाते,ती म्हणजे गुडघा दुखीची आणि गुडघा वाकवता न येण्याची.सध्या तरुणांमध्येही सांधेदुखीचं प्रमाण वाढत असून,ती सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदनांमुळे व्यक्तीच्या हालचालींवर मर्यादा येतात.या मर्यादांमुळे त्याच्या दैनंदिन कामावर थेट परिणाम होतो. त्यामुळे या विकाराची लक्षणं,त्याचं निदान, त्याच्या उपचारांची प्रक्रिया व हा त्रास होऊच नये म्हणून घ्यायची काळजी आणि या वेदनेतून मुक्त होऊन आरोग्यमय आयुष्य कसं जगावं,हे आपण बघुयात . कारणं आणि लक्षणं सांधेदुखीचं मुख्य लक्षण म्हणजे गुडघ्याभोवती असलेल्या कुर्चा ( कार्टिलेज ) झिजतात.त्यामुळे गुडघ्याची गादी कमी होते.यामागे विविध कारणं असतात,जसं की अनुवंशिकता,गुडघ्यावर सतत अतिरिक्त ताण येणं,स्थूलपणा,अयोग्य अशी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव. प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास असतोच; पण सांधेदुखीचं गुडघेदुखी हे एकमेव लक्षण असू शकत नाही. गुडघेदुखी बरोबरच गुडघा वाकवता न येणं, त्यावर सूज येणं, सरळ चालताना तो दुखणं, चालताना कुर्चा दुखणे आणि सातत्यानं होणारी गुडघेदुखी हि सारी लक्षणं झीजेची असू शकतात. त्यामुळे अशा वेळी त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. आरोग्यदायी जीवनशैली जगा: बैठं काम असलेल्या जीवनशैलीमुळेही तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास निमाण होऊ शकतो.त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव, जास्त वजन, जंक फूड खाण्यामुळं तुमचा गुडघा कमकुवत होऊन त्याची हानी होऊ शकते. त्यातून कुर्चेचा स्तर कमी होत जातो. गुडघ्यातल्या कुर्चाची झीज झाल्यानंतर ती पुन्हा भरून येऊ शकत नाही.थोडक्यात आपली जीवनशैली कशी आहे,त्यावर गुडघ्यातील कुर्चाचं काम ठरत असतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करून गुडघेदुखी दूर ठेवता येऊ शकते. उपचारांचे पर्याय: शरीरातील सांधेदुखीचे प्रमाण वाढल्यावर शरीरातील हालचालींवर मर्यादा येतात. वेदनाशामक औषधांमुळे केवळ तात्कालिक कालावधीसाठी वेदनेपासून मुक्तता मिळते;पण गुडघादुखीवर ही औषधं कायमस्वरुपी उपाय म्हणून गृहीत धरू नये. १. तीळ तेल कोमट करून त्याने गुडघ्यांची मसाज करू शकता किंवा महानारायण तेल कोमट करून मसाज करावे. गरम शेक घ्यावा यामुळे गुडघ्याला गतिशीलता आणि लवचिकता येते. २. गुडघ्यांची झीज होत असेल तर “जानूबस्ती” म्हणजे गुडघ्यांच्या भोवती पिठाचे पाळे करून औषधी तेल मुरवणे हे श्रेष्ठ उपचार आहेत. ३. लाक्षादी गुग्गुळ हि गोळी सकाळी १ आणि रात्री १ घ्यावी . ४. आहारातून कॅल्शियम ची कमतरता पूर्ण करावी. जर याने आराम नाही मिळाला तर जवळच्या आयुर्वेदीक तज्ञाची भेट घ्यावी . * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा-मुंबई-१) कोपरखैरणे २) दादरपुणे -१) निगडी २) बाणेर ३) मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?

कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा? आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये “पादाभ्यंग” सांगितलेले आहे त्यात कास्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:- ◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी◆पायावरची सूज कमी करण्यासाठी◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे “कांस्यम बुद्धीवर्धकम”आपल्या मराठीत एक म्हण आहे ” तळपायाची आग मस्तकात जाणे” आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला कास्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते.वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे, युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात. संस्कृतमध्ये 1 श्लोक आहे ज्यात म्हटलं आहेजो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग असे दूर राहतात जसे गरूडपासून साप .आपल्या शरीरात 72000 नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळाव्यात होतो त्यामुळे तळव्याचा मसाज हा अनेक दुखण्यावरचा एक गुणकारी व कमी खर्चाचा उपाय आहे.ऐतिहासिक वारसाकांस्य हा धातू आपल्याला फक्त सुवर्ण आणि रोप्य पदकांसोबत कांस्य पदक देतात म्हणून माहिती आहे. भारतात बहुतेक प्रांतामध्ये लग्नामध्ये मुलीला कास्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते पण तिचा उपयोग मात्र कमीच केला जातो. कासे हा तांबे आणि जस्त यांचा संमिश्र धातू असून आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणून 5000 वर्षांपूर्वीपासून सांगितलेला आहे. गुजरातमध्ये जेवणासाठी कास्याच्या थाळ्याच वापरतात, पूजेसाठी कास्याचे तबक वापरले जाते, मंजुळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटासाठीही कासेच वापरले जाते, तसेच काठिण्य व ऑक्सिडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बनविण्यासाठी हा धातू वापरला जात असे, पूर्वी रशियामध्ये चर्चघंटा, तर स्पेन आणि पुर्तुगालमध्ये तोफा या धातूच्या बनवीत असत.वातव्यधीहरम कफप्रशनम कांतीप्रसादावहम त्वगवेवर्ण्य विनाशनम रुचिकरमम सर्वांग दाढर्याप्रदम आग्नेरदीप्तीकर्मम बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्याम मर्दनमुदिशनती मूनया: श्रेष्ठम सदा प्राणायामम्हणजे ऋषि मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे.सुवर्णासमान कांती प्रदान करणारे, त्वचेचा वर्ण गौर करणारे, अग्नी प्रदीप्त करणारे, बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे,आणि रुचिकारक आहे .   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Scroll to Top